शेवगाव तालुक्यातील रब्बी हंगामातील ७९ गावांची हंगामी सुधारीत पैसेवारी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 05:10 PM2019-01-31T17:10:06+5:302019-01-31T17:10:15+5:30
तालुक्यातील रब्बी हंगामातील ७९ गावांची हंगामी सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाच्या आत जाहीर झाल्याने शेतक-यातून समाधानाचे वातावरण आहे.
शेवगाव : तालुक्यातील रब्बी हंगामातील ७९ गावांची हंगामी सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाच्या आत जाहीर झाल्याने शेतक-यातून समाधानाचे वातावरण आहे. महसूल प्रशासनाने या सर्व गावांची नजर आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांसह शेतक-यांतून नाराजीचे सावट तयार झाले होते. आता फेब्रुवारी अखेर जाहीर होणाया अंतिम पैशेवारी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महसूल प्रशासनाने शेवगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, भातकुडगाव मंडळाधिकारी यांच्याकडील अहवालानुसार पैसेवारी जाहीर केली आहे. एरंडगाव, लाखेफळ (४९), बोडखे, ब-हाणपूर, दहिफळ, ढोरहिंगणी, क-हेटाकळी, कर्जत खु., विजयपूर (४८), अंतरवली खु ने, दादेगाव, दहीगाव शे, घोटण, गदेवाडी, गरडवाडी, खुंटेफळ, खानापूर, लोळेगाव, मलकापूर, निंबे, सामनगाव, ताजनापूर, वडुले बु., वाघोली(४७), आपेगाव, आव्हाने बु, आव्हाने खु, अंत्रे, भाविनिमगाव, दहीगाव ने, ढोरजळगाव शे,ढोरजळगाव ने, ढोरसडे, देवटाकळी, देवळाने, घेवरी, कुरुडगाव, मळेगाव, नांदूर विहीरे, सुलतान बु, शहरटाकळी, शहापुर, तळणी, वडुले खु, रांजणी, रावतळे (४६), आखतवाडे, भातकुडगाव,खडके, खामपिंप्री, मडके, खडके,मुंगी, पिंगेवाडी (४५), हिंगणगाव ने, मजलेशहर (४४), हातगाव, कांबी, लख्मापुरी, प्रभूवाडगाव, सोनविहीर (४३), बालमटाकळी, भायगाव, चापडगाव ,गायकवाड जळगाव, जोहारापूर, खामगाव, ठाकूर पिंपळगाव (४२) अमरापूर, आखेगाव तितर्फा, डोंगर आखेगाव, खरडगाव, मुर्शदपूर(४१), भगूर, शेवगाव, सुलतानपूर खु, शहाजापूर (४०)