सलग दुसऱ्या दिवसीही दूधाचा रत्यावर पूर

By Admin | Published: June 2, 2017 02:05 PM2017-06-02T14:05:59+5:302017-06-02T14:05:59+5:30

सलग दुसऱ्या दिवशी नगर-दौंड रस्ता शेतकऱ्यांनी रोखला़ वाहनांची तपासणी करुन दुधाचे टँकर रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला़

The second day continuously flooded on milk | सलग दुसऱ्या दिवसीही दूधाचा रत्यावर पूर

सलग दुसऱ्या दिवसीही दूधाचा रत्यावर पूर

आॅनलाईन लोकमत
वाळकी दि़ २ - नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे सलग दुसऱ्या दिवशी नगर-दौंड रस्ता शेतकऱ्यांनी रोखला़ वाहनांची तपासणी करुन दुधाचे टँकर रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला़
कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत़ ठिकठिकाणी शहरांकडे जाणारा भाजीपाला आणि दूध अडविले जात आहे़ नगर-दौंड रस्त्यावर बाबुर्डी बेंद येथे सलग दुसऱ्या दिवसी दुधाचा टँकर रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करीत कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांनी केली़ यावेळी संजय गिरवले, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, प्रविण कोठुळे, भिवसेन इंगळे, संतोष इंगळे, ज्ञानदेव इंगळे, पोपट गिरवले, मनोज देविकर, रमेश साबळे, सुभाष गिरवले, दत्ता गिरवले, शरद वाडेकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: The second day continuously flooded on milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.