कोविशल्डचा दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:20 AM2021-04-06T04:20:40+5:302021-04-06T04:20:40+5:30
अहमदनगर : कोरोनावरील कोविशिल्डचा दुसरा डोस ६ ते ८, तर कोव्हक्सीनचा ४ ते ६ आठवड्यांनी, असा लसीकरणाचा ...
अहमदनगर : कोरोनावरील कोविशिल्डचा दुसरा डोस ६ ते ८, तर कोव्हक्सीनचा ४ ते ६ आठवड्यांनी, असा लसीकरणाचा कालावधी निश्चित करण्यात आहे. कोरानावरील लसीकरणाबाबत शासनाने दिलेल्या नियमानुसार डोस घेणे आवश्यक असून, त्यानुसार प्रत्येकाने नियोजन करणे गरजेचे आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
कोरोनावरील लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने दोन डोसमधील कालावधी किती असावा, याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार कोविशल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांनी म्हणजे ४२ ते ५६ दिवसांत घेणे आवश्यक आहे. तसेच कोव्हक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा ४ ते ६ म्हणजे २८ ते ४२ दिवसांत घेणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात पहिला डेास घेतलेल्या व्यक्तींना महिनाभराने दुसरा डोस घेण्याबाबत मोबाईलवर मसेज येत आहे. परंतु, दरम्यानच्या काळात शासनाने याबाबत नव्याने आदेश जारी केला आहे. त्यामुळे नव्याने जारी केलेल्या आदेशानुसारच नागरिकांनी डोसे घेणे आवश्यक आहे.
.....
- कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र शासनाने नियमावली जाहीर केलेली आहे. त्यानुसार कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यापासून पुढे सहा ते आठ आठवड्यात दुसरा डाेस घेणे आवश्यक आहेत. अशीच नियमावली कोव्हॅक्सीनबाबतही आहे. कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यापासून पुढे ४ ते ६ आठवड्यांत दुसरा डोस घ्यावा.
- डॉ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी, महापालिका