लसीचा दुसरा डोस प्राधान्याने द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:54+5:302021-05-11T04:20:54+5:30
मंत्री तनपुरे हे रविवारी श्रीरामपुरात कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत ...
मंत्री तनपुरे हे रविवारी श्रीरामपुरात कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, गटविकास अधिकारी दिघे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश बंड आदी उपस्थित होते.
तनपुरे म्हणाले, ज्यांचा लसीचा पहिला डोस झाला आहे, त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देणे महत्त्वाचे आहे. ज्या केंद्रावर त्यांनी पहिली मात्रा घेतली आहे, त्या केंद्रावर त्यांच्या नोंदी आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तारीख पाहून संबंधितांना फोन करून लस घेण्यासाठी बोलवावे. तसे केल्यास लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही आणि सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्वांना वेळेत मात्रा मिळतील. गर्दी टाळण्यासाठी शहर व ग्रामीण असे दोन भाग करून नगरपालिका हद्दीतही लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.