ग्रामसेवकांच्या प्रश्नांबाबत सचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:21 AM2021-03-23T04:21:38+5:302021-03-23T04:21:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव राजेश कुमार यांनी मुंबईत ...

Secretary regarding Gram Sevak's questions | ग्रामसेवकांच्या प्रश्नांबाबत सचिव

ग्रामसेवकांच्या प्रश्नांबाबत सचिव

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव राजेश कुमार यांनी मुंबईत बैठक घेऊन विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

या चर्चेवेळी उपसचिव वित्त विभाग जाधवर, अवर सचिव कराड, मनरेगाचे उपसचिव, कक्ष अधिकारी, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, संजीव निकम, सुचित घरत, कल्पेश अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती, प्रवास भत्ता वाढ, पदवीधर ग्रामसेवक भरती, वैद्यकीय कॅशलेस सुविधा, अतिरिक्त कामकाज कमी करणे, ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करणे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ बाबत आणि जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढी देणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व प्रलंबित प्रश्न, तसेच मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्याची ग्वाही या बैठकीत देण्यात आली, अशी माहिती एकनाथ ढाकणे यांनी दिली.

------------

फोटो मेल

२२ ग्रामसेवक चर्चा

ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव राजेश कुमार यांनी मुंबईत बैठक घेऊन विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामसेवक संघटनेला दिले.

Web Title: Secretary regarding Gram Sevak's questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.