श्रीरामपुरात फूस लावून पळविणे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:03+5:302021-09-22T04:24:03+5:30

स्टार ११९८ श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फूस लावून पळविण्याच्या तसेच अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ दिसून येत ...

Seduction in Shrirampur, | श्रीरामपुरात फूस लावून पळविणे,

श्रीरामपुरात फूस लावून पळविणे,

स्टार ११९८

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फूस लावून पळविण्याच्या तसेच अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ दिसून येत आहे. खुनाच्या गुन्ह्यांचा आलेखही कायम राहिला आहे. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीतून हे चित्र समोर आले आहे. शहराबरोबरच बेलापूर व अशोकनगर या दोन प्रमुख गावांचा शहर पोलीस ठाण्यामध्ये समावेश होतो. तेथेही गुन्ह्याच्या घटना सातत्याने नोंदविल्या जात आहेत. पोलीस दलासमोर गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच गुन्ह्यांची उकल करून आरोपींना गजाआड करण्याचे मोठे आव्हान राहिले आहे. येथील गुन्ह्यांच्या तपासाकरिता जिल्हा पोलीसप्रमुखांनाही प्रसंगी शहरात येऊन ठाण मांडावे लागले आहे.

---------

गुन्ह्यांची आकडेवारी काय सांगतेय

२०२०

खून : २

फूस लावून पळविणे : १२

बलात्कार : ९

-----------

२०२१ (ऑगस्टअखेर)

खून : २

फूल लावून पळविणे : १४

बलात्कार : ५

-------------

या घटनेने हादरले होते श्रीरामपूर

मार्च २०२१ मध्ये बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा विषय चर्चिला गेला होता. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींविरुद्ध न्यायालयात साडेपाचशे पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पैशांसाठी अपहरण व खून करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.

---------

बनावट विवाह लावणारी टोळीही कार्यरत

विवाहेच्छुक तरुणांचा बनावट नवरीशी विवाह करून देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचाही जानेवारी २०२१ मध्ये पोलिसांनी पर्दाफाश केला होता. ही टोळी राज्यभर कार्यरत असून, श्रीरामपूरमधील काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यात सहभागी असल्याचे कारवायांमधून उघड झाले.

----------

Web Title: Seduction in Shrirampur,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.