पेरलेले उगवलेच नाही; संगमनेर तालुक्यात ४४ शेतक-यांच्या बियाणांबाबत तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 03:52 PM2020-07-31T15:52:54+5:302020-07-31T15:53:44+5:30
पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या ४४ तक्रारी संगमनेर तालुक्यातील शेतक-यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यात बाजरी, सोयाबीन, कांदा, भुईमूग आदी पिकांच्या बियाणांच्या तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींपैकी १६ शेतक-यांनी आपले तक्रार अर्ज मागे घेतले आहेत.
संगमनेर : पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या ४४ तक्रारी संगमनेर तालुक्यातील शेतक-यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यात बाजरी, सोयाबीन, कांदा, भुईमूग आदी पिकांच्या बियाणांच्या तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींपैकी १६ शेतक-यांनी आपले तक्रार अर्ज मागे घेतले आहेत.
उर्वरित २८ शेतक-यांच्या तक्रारीनुसार तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने शेतकºयांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे, अशी माहिती बियाणे तक्रार निवारण समितीचे सचिव किरण आरगडे यांनी दिली.
तक्रार असलेल्या बियाण्यांचे उपलब्ध बियाण्यांपैकी एकूण दहा नमुने घेत ते पुणे येथील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी तीन नमुने प्रमाणित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. तर उर्वरित सात नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.