बांधावरील बीजप्रक्रियेचे प्रयोग झाले ग्लोबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:15 AM2021-06-26T04:15:57+5:302021-06-26T04:15:57+5:30

या स्पर्धेत आतापर्यंत ६ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीत ८०४ शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेचे व्हिडीओ संयोजकांकडे पाठविले आहेत. या व्हिडीओंना युट्यूबवर ...

The seed processing on the dam was experimented with globally | बांधावरील बीजप्रक्रियेचे प्रयोग झाले ग्लोबल

बांधावरील बीजप्रक्रियेचे प्रयोग झाले ग्लोबल

या स्पर्धेत आतापर्यंत ६ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीत ८०४ शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेचे व्हिडीओ संयोजकांकडे पाठविले आहेत. या व्हिडीओंना युट्यूबवर ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या स्पर्धेत सर्वाधिक तरुण शेतकरी सहभागी झाल्याचे या स्पर्धेचे समन्वयक व गेवराई येथील कृषी सहायक सुखदेव जमधडे यांनी सांगितले. १४ मे ते १५ जुलै या कालावधीत ही बीजप्रक्रिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नोंदणीसाठी एक लिंक तयार करण्यात आली असून नोंदणीनंतर शेतकऱ्यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व सांगताना व करून दाखवताना स्वतःचा एक व्हिडीओ तयार करून तो साहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेजच्या जिल्हा समन्वयक यांच्याकडे पाठवायचा आहे. शेतकऱ्याकडून आलेले व्हिडीओ द फार्म बुक या युट्यूब चॅनेलवर अपलोड केले जात आहेत. या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातून तीन विजेते जाहीर केले जाणार आहेत. या उपक्रमासाठी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी विभागाचे विस्तार संचालक विकास पाटील हे मार्गदर्शन करत आहेत. या स्पर्धेसाठी आहाय्यक कृषी अधिकारी परिवारातील सदस्य परिश्रम घेत आहेत.

शाळकरी मुलांचाही सहभाग

शाळकरी मुलांनीही आपल्या आई-वडिलांना बीजप्रक्रियेचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी व्हिडीओ बनवून स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. राहुरी येथील सुदीक्षा कदम, संगमनेर येथील अंजली केने, सातारा येथील स्वरूप व सार्थक लाड या मुलांच्या व्हिडीओला युट्यूबवर मोठी पसंती मिळाली आहे.

------------------

शेतीमध्ये बीजप्रक्रियेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करणे, रोग कीड व्यवस्थापन खर्चात बचत करणे या बाबी बीजप्रक्रियेमुळे साध्य होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून बीजप्रक्रिया लोकचळवळ व्हावी या उद्देशाने साहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेजच्या माध्यमातून खरीप हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

- सुखदेव जमधडे, कृषी साहाय्यक गेवराई, बीड

----------------------------

बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक स्पर्धेत आमच्या गणराज कृषी गटाच्या माध्यमातून मूग बियाणे बीजप्रक्रियेचा संपूर्ण व्हिडीओ तयार केला. आमचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांनी पाहिले व स्वतः बीजप्रक्रिया करण्यास सुरुवात केली.. फार्मबुक युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आजवर ३ हजार शेतकरी बंधूंनी माझा व्हिडीओ पहिला आहे.

- नीलेश सुखदेव गायकवाड, देवदैठण, श्रीगोंदा

फोटो २५ बीजप्रक्रिया

ओळी= बीजप्रक्रिया स्पर्धेत बीड जिल्ह्यातील धारूर येथील सहभागी झालेले शेतकरी.

Web Title: The seed processing on the dam was experimented with globally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.