पोलिसांना पाहताच हातातील तलवार फेकून त्याने ठोकली धूम
By अण्णा नवथर | Published: December 16, 2023 10:40 AM2023-12-16T10:40:58+5:302023-12-16T10:41:28+5:30
पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने अटक केली.
अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : रस्त्यात झालेल्या अपघाताच्या कारणावरून वाद घालत एकचं थेट रुग्णालयात तलवार घेऊन आला. ही खबर पोलिसांना मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांना पाहताच तलवार टाकून त्याने धूम ठोकली. हा प्रकार नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सीताराम श्रीराम खताळ वय-४८ (रा.सावेडी अहमदनगर) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
त्याची रस्त्यात अपघात झाल्याने एकाशी वाद झाला होता त्यानंतर हा आरोपी घरी गेला. तो तलवार घेऊन दवाखान्यात आला. ही माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे एक पथक तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला. पोलिसांना पाहताच त्यांने हातातील तलवार फेकून दिली आणि तिथून पळून गेला. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , कोठी परिसरातील एका हॉस्पिटलच्या आवारात एक इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त खबर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यादव यांनी कोतवाली पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता तलवार घेऊन फिरणारा युवक आढळून आला नाही. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी हॉस्पिटलच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता एक इसम हातात तलवार घेऊन फिरताना दिसला. मात्र पोलिसांना खबर लागताच त्याने आपल्या हातातील तलवार हॉस्पिटलच्या गेटवर सोडून पळून गेला. त्यानंतर गेटजवळ जाऊन पाहिले असता पोलिसांना त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाची त्याला केशरी रंगाची कडा असलेली म्यान व त्याच्या आतमध्ये टोकदार लोखंडी तलवार निदर्शनास आली. तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचे नाव विचारले असता सीताराम श्रीराम खताळ वय-४८ (रा.सावेडी अहमदनगर) असे सांगण्यात आले.तो इसम अपघातानंतर झालेल्या बाचाबाची नंतर वाद करण्यासाठी आला होता. कोतवाली पोलिसांनी सदरील तलवार जप्त केली. तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील प्रवीण पाटील, तनवीर शेख, गणेश धोत्रे, सलीम शेख, अभय कदम, सुजय हिवाळे, अतुल काजळे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने केली.