लॉकडाऊन असेपर्यंत जप्त केलेली वाहने नाही सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 06:00 PM2020-05-04T18:00:52+5:302020-05-04T18:01:04+5:30
अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाºयांचे वाहने जप्त करण्याची मोहीम जिल्हाभर सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी जिल्हाभरात पावणेपाच हजार वाहने जप्त केले आहेत. जोपर्यंत लॉकडाऊन शिथिल होत नाही, तोपर्यंत ही वाहने सोडली जाणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी सांगितले.

पोलिसांनी जप्त केलेली वाहने सोडून घेण्यासाठी अनेक जण पोलीस स्टेशनला हेलपाटे मारत आहेत. मात्र सध्यातरी वाहनचालकांना त्यांचे वाहन ताब्यात मिळणार नाहीत. लॉकडाऊनमध्ये घरातच थांबावे, असे प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही अनेक जण वाहने घेऊन रस्त्यावर फिरत असल्याने पोलिसांनी जिल्हाभरात वाहने जप्त करून वाहन मालकावर शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या महिनाभरापासून ही मोहीम सुरू आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे रस्त्यावर फिरणाºयांची संख्या कमी झाली. ज्यांच्याकडे एकच वाहन आहे त्यांची मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे. पोलिसांनी मोटरसायकलीसह कारही जप्त केल्या आहेत.