श्रीरामपूर पालिकेच्या अभ्यासिकेच्या १५ विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड
By शिवाजी पवार | Published: May 24, 2023 01:59 PM2023-05-24T13:59:39+5:302023-05-24T14:00:07+5:30
श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय अभ्यासिकेच्या १५ विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड झाली आहे.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय अभ्यासिकेच्या १५ विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपमुख्यधिकारी धनंजय कविटकर, ग्रंथपाल स्वाती पुरे, लेखापाल रमेश निकाळजे, रावसाहेब घायवट उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये गणेश गोटे, रोहित पगार, शुभम पऱ्हे, राहुल भोईटे, ऋतिक गोराणे, अक्षय आढाव, सचिन शेळके, करण वंजारी, रवींद्र पवार, सागर वाघ, शिवराज कदम, योगेश पळसे, पल्लवी पटाट, विजयराज खेते, ज्ञानेश्वर वाडेकर यांचा समावेश आहे. लोकमान्य टिळक वाचनालयाच्या अभ्यासिकेतील अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे.
अभ्यासिकेच्या आधुनिकीकरणाचे उदघाटन दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले होते. विद्यार्थ्यांनी नियमित व अभ्यासात सातत्य ठेवल्यास निश्चित यश मिळते. १५ विद्यार्थी पोलिस दलात भरती झाल्याने पालिकेच्या वाचनालयाचा निश्चितच उपयोग होत आहे.