शटर बंद करून माल विकणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:49+5:302021-05-10T04:20:49+5:30
अहमदनगर : शहरात कडक निर्बंध लागू असताना दाळमंडई येथे चोरून किराणा मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला १५ हजारांचा दंड करण्यात ...
अहमदनगर : शहरात कडक निर्बंध लागू असताना दाळमंडई येथे चोरून किराणा मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला १५ हजारांचा दंड करण्यात आला आहे. महापालिकेच्या भरारी पथकाने रविवारी ही कारवाई केली.
महापालिकेने शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र, समोरी शटर बंद करून किराणा, भाजीपाला आदींची विक्री सुरू आहे. शहरातील दाळमंडई परिसरात व्यापाऱ्यांकडून चोरून किराणा मालाची विक्री करत असल्याची माहिती महापालिकेच्या भरारी पथकाचे प्रमुख शशिकांत नजान यांना मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दाळमंडई परिसरात भेट दिला असता किराणा मालाची चोरून विक्री सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. भरारी पथकाने संबंधित दुकानदारास १५ हजारांचा दंड केला. तसेच कल्याण राेड परिसरातही दुकान सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथील दुकानदाराला ५ हजार रुपयांचा दंड केला. पथकात राहुल साबळे, सूर्यभान देवघडे, नंदकुमार नेमाणे, भास्कर अकुबत्तीन, राजेश आनंद, अमोल लहारे यांचा समावेश होता.