सेनेचे वाघ मातोश्रीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:14 AM2018-12-15T11:14:18+5:302018-12-15T11:14:45+5:30

महापालिकेत शिवसेना-भाजपाच्या युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे़

Senate's Tiger Matoshri | सेनेचे वाघ मातोश्रीवर

सेनेचे वाघ मातोश्रीवर

अहमदनगर : महापालिकेत शिवसेना-भाजपाच्या युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे़ सेनेचे नगरसेवक शनिवारी मातोश्रीवर हजर राहणार असून, त्यांच्या उपस्थितीतच सेनेचे मंत्री भाजपाशी चर्चा करणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले़ युतीसह महापौर पदाचा निर्णयही मातोश्रीवरच होणार आहे़
महापौर निवडणुकीत भाजपाला सोबत घेण्याची तयारी शिवसेनेने दाखविली आहे़ सेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी गुरुवारी चर्चा केली़ चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय झाला़पण, मुख्यमंत्री संसदीय अधिवेशनानिमित्त दिल्लीत होते़ ते शुक्रवारी मुंबईत परतले़ त्यांच्याशी पालकमंत्री शिंदे चर्चा करणार आहेत़ दरम्यान मातोश्रीवर शनिवारी उपस्थित राहण्याचा निरोप गुरुवारी सेनेच्या नगरसेवकांना मिळाला़ उपनेते अनिल राठोड यांच्यासह गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते शुक्रवारी रात्री मुंबईला रवाना झाले़ शनिवारी सकाळी उर्वरित नगरसेकही मातोश्रीवर पोहोचतील़ सेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नगरसेवकांना शनिवारी सकाळी ११ वाजेची वेळ दिलेली आहे़ यावेळी सेनेचे मंत्री नगरमध्ये युती करण्याबाबत भाजपाच्या मंत्र्यांशी चर्चा करणार असून, महापौर पदाबाबतही चर्चा होणार आहे़ सेना-भाजपाची युतीबाबत जुळवाजुळव सुरू झाली आहे़ पण, राष्ट्रवादीच्या गोटातही सत्ता स्थापनेच्या हलचाली सुरू झाल्या आहेत़ राष्ट्रवादीकडे स्वत:चे १८ नगरसेवक आहेत़ काँग्रेसचे ५, असे मिळून त्यांची संख्या २३ होते़ बसपाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले़ याशिवाय भाजपाचे काही नगरसेवकही राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत़ मात्र यासंदर्भातला निर्णय स्थानिक पातळीवर न घेता तो वरिष्ठ पातळीवर होणे अपेक्षित आहे़ वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदिल मिळाल्यास राष्ट्रवादीही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो़ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी स्थानिक नेत्यांची चर्चा सुरू असल्याचे समजते़ परंतु, महापालिकेतील सत्ता स्थापनेला अगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची किनार असल्याने वरिष्ठनेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
महापौर निवडणुकीचा प्रस्ताव सादर
महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठीचा प्रस्ताव महापालिकेने विभागीय आयुक्तांना शुक्रवारी सादर केला़ विभागीय आयुक्तांकडून निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल़

Web Title: Senate's Tiger Matoshri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.