ज्येष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:03+5:302021-08-01T04:21:03+5:30
गावातील तरुणांच्या आग्रहाखातर टाकळी काझी गावचे ते सरपंच झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. १९६२ ...
गावातील तरुणांच्या आग्रहाखातर टाकळी काझी गावचे ते सरपंच झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. १९६२ ला पंचायत राज आल्यानंतर ते नगर तालुका पंचायत समितीचे सभापती झाले. १९७८ पर्यंत ते कधी सभापती तर कधी उपसभापतिपदावर राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्यासाठी मुंबईला अनेकदा आंदोलने, मोर्चे निघाले. त्यात ते सक्रिय सहभागी होते. १९७८ च्या आणीबाणी काळात दिवगंत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ७४ सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे फक्त ३ सदस्य निवडून आले. त्यात त्यांचा समावेश होता. ते १६ वर्षं सतत जि. प.मध्ये सभापती राहिले. याच काळात त्यांनी दोनदा विधानसभा लढविली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यांचे चिरंजीव संपतराव म्हस्के कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत.
---
३१ बन्सीभाऊ म्हस्के