ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी यांचा मत्यू, जिल्ह्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 11:39 PM2020-11-07T23:39:32+5:302020-11-08T00:02:09+5:30
नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अहमदनगर - ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधु प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर, रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. गौरी ह्या यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांच्या गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहता) येथील आहे. पती यशवंत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौरी यांचा समाजकार्यात सहभाग होता.