ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:01 AM2018-03-21T11:01:45+5:302018-03-21T11:10:32+5:30
शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालबाबत आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी राळेगण सिध्दी ग्रामस्थांनी भावनाविवश होत अण्णांना निरोप दिला.
अहमदनगर : शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालबाबत आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी राळेगण सिध्दी ग्रामस्थांनी भावनाविवश होत अण्णांना निरोप दिला.
आज सकाळी हजारे यांनी ग्रामदैवत यादवबाबा मंदिर, निळोबाराय, पद्मावती मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर कारने ते पुण्याकडे रवाना झाले. पुण्यावरुन ते विमानाने दिल्लीला जाणार आहेत. यावेळी अण्णांना निरोप देण्यासाठी शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ‘तब्येतीची काळजी घ्या, जास्त दिवस उपोषण करू नका’ अशी विनंती ग्रामस्थांनी अण्णांना केली.
अण्णा हजारे यांनी सर्वांचा स्मितहास्य करीत निरोप घेतला. मी ८० वर्षाचा तरुण आहे, तरुणांमध्ये जेवढा उत्साह आहे तेवढाच उत्साह माझ्यामध्ये आहे, असे अण्णा यांनी दोन दिवसांपुर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. निरोपावेळी या मुलाखतीची ग्रामस्थांची आठवण झाली.