बेलवंडी परिसरातील कुकडी कॅनॉलमध्ये दोन मृतदेह आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:42 IST2020-03-21T12:41:41+5:302020-03-21T12:42:37+5:30
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील कुकडी कॅनॉलमध्ये घोटवी गेट येथे एक पुरूषाचा (वय ५० ते ५५) तसेच कोळगाव साकेवाडी येथे एका स्त्रीचा (वय ३० ते ४०) असे दोन बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

बेलवंडी परिसरातील कुकडी कॅनॉलमध्ये दोन मृतदेह आढळल्याने खळबळ
श्रीगोंदा : बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील कुकडी कॅनॉलमध्ये घोटवी गेट येथे एक पुरूषाचा (वय ५० ते ५५) तसेच कोळगाव साकेवाडी येथे एका स्त्रीचा (वय ३० ते ४०) असे दोन बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. या संदर्भात पारनेर, सुपा, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा पोलिसांना मृतांची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे फोटो पाठविण्यात आले आहेत, आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली. दरम्यान, मृतदेह सापडल्याने बेलवंडी, घोटवी परिसरात खळबळ उडाली आहे.