कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:25 AM2021-09-04T04:25:58+5:302021-09-04T04:25:58+5:30

यावेळी अहमदनगर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, वकील संघाच्या महिला सचिव ॲड. मीनाक्षी कराळे, ॲड. सुभाष भोर, विशेष ...

Separate cell for women lawyers in Family Court | कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष

कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष

यावेळी अहमदनगर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, वकील संघाच्या महिला सचिव ॲड. मीनाक्षी कराळे, ॲड. सुभाष भोर, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. शिवाजी कराळे, कार्यकारिणी सदस्य ॲड. सुनील तोडकर, ॲड. अनिता दिघे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. प्रज्ञा उजागरे, ॲड. प्रज्ञा हेंद्रे, ॲड. पल्लवी पाटील, ॲड. राजेश कावरे, ॲड. शेलोत, ॲड. सागर पादीर, ॲड. अभय राजे, ॲड. अरुणा राशीनकर, एस.बी. बिडवे आदी उपस्थित होते.

स्वतंत्र बार रूम नसल्याने अनेक महिला वकिलांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात बार असोसिएशनने महिला वकिलांकरिता स्वतंत्र वकील कक्षाची मागणी उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयाकडे केली होती. आता या मागणीची पूर्तता झाली आहे. कौटुंबिक न्यायालयात काम करण्यास महिला वकिलांना या कक्षाचा चांगला लाभ होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे यांनी सांगितले. न्या. कंक यांनी महिला वकिलांना स्वतंत्र वकील कक्ष मिळाल्याने यापुढे अधिक चांगले व सुलभ न्यायालयीन कामकाज होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कोरोना नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम पार पडला.

............

फोटो ०३ वकील कक्ष

ओळी- कौटुंबिक न्यायालयात महिला वकील कक्षाचे उद्घाटन करताना न्या. नेत्र कंक समवेत बार असोसिएशनचे अध्यक्ष भूषण बऱ्हाटे, ॲड. अनिता दिघे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. सुरेश लगड आदी.

Web Title: Separate cell for women lawyers in Family Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.