शिर्डीत हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्मगुरूंचे प्रवचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:39 AM2018-08-21T02:39:57+5:302018-08-21T06:59:43+5:30

सप्ताहासाठी मुस्लिम बांधवांनी सात लाख रूपयांची देणगी दिली.

Sermons of Muslim religious leaders in Shirdi Hari Nainam Week | शिर्डीत हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्मगुरूंचे प्रवचन

शिर्डीत हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्मगुरूंचे प्रवचन

शिर्डी : पावणे दोनशे वर्षांची परंपरा व हिंदू धर्माचे व्यासपीठ असलेल्या येथील गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्मगुरूंनी प्रवचन देण्याची ऐतिहासिक घटना घडली. सप्ताहासाठी मुस्लिम बांधवांनी सात लाख रूपयांची देणगीही दिली.

महंत रामगिरी महाराज सप्ताहात रोज प्रवचन देतात़ सोमवारी अहमदनगरचे मौलाना अन्वर नदवी व पारनेरचे डॉ़ रफीक सय्यद यांचेही प्रवचन झाले़ तिघांनी ‘सर्वच धर्म मानवता, बंधुता, अहिंसेचे पालन करण्यास सांगत असल्याचे सांगितले. ‘धर्माचा उपयोग मने जोडण्यासाठी व्हावा’ असे सांगत साईबाबांनी पायाभरणी केलेल्या हिंदू-मुस्लीम ऐक्य विचाराची त्यांनी पुनर्पेरणी केली़ शिर्डीतील हिंदू-मुस्लिम सलोख्याची शंभर वर्षांची परंपरा पुढेही कायम राहो, अशा सदिच्छाही संतांनी दिल्या.

सप्ताहात पंगतीला वाढण्याची जबाबदारी मुस्लिम बांधवांनी घेतली होती़ दिवसभर जवळपास पाचशे मुस्लिमबांधवांनी भाविकांना आमटी-भाकरीचा प्रसाद दिला.

Web Title: Sermons of Muslim religious leaders in Shirdi Hari Nainam Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.