सुपा आरोग्य उपकेंद्रांतर्गत सात कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:21 AM2021-03-25T04:21:00+5:302021-03-25T04:21:00+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा आरोग्य उपकेंद्रांतर्गत मार्चमध्ये १२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी पाच रूग्ण उपचार ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा आरोग्य उपकेंद्रांतर्गत मार्चमध्ये १२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी पाच रूग्ण उपचार घेऊन घरी परतले. उर्वरित सात जणांवर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या बारवकर यांनी दिली.
कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांनी काळजी घेऊन शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. सुप्यात सर्वाधिक नऊ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्या पाठोपाठ शहजापूरमध्ये दोन, आपधूपमध्ये एक रूग्ण पॉझिटिव्ह आल्याचे बारवकर यांनी सांगितले. सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी सुप्यातील चार रूग्ण असून या सर्व रूग्णांपैकी दोन जण नगरला बूथ हॉस्पिटलमध्ये तर इतर रूग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
गर्दी होणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करावा, घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.