राहुरीत सात दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 04:11 PM2020-09-07T16:11:29+5:302020-09-07T16:12:01+5:30
राहुरी : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यू दर देखील वाढला आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता संपुर्ण तालुक्यात स्वयंस्फूर्तीने १० ते १७ सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे.

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. ही आकडेवारी रोखण्यासाठी उपाययोजना करावी म्हणून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सुचनेवरून सोमवारी नगरपालिकेच्या सभागृहात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्हे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, दादापाटील सोनवणे, डॉ. जयंत कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, सर्व व्यापारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दोन तासांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या आठ दिवसांमधे अत्यावश्यक सेवा वगळता पुर्ण व्यवहार हे ठप्प असणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीसह किराणा दुकाने, भाजी मंडई पुर्ण पणे बंद राहणार आहे. दुध संकलन सकाळ-संध्याकाळ दोन तास, मेडीकल स्टोअर्स सकाळी ९ ते १२ तर रूग्णालयांशी संलग्न असणारे मेडीकल, दवाखाने हे सुरू असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी केले आहे.