लाॅकडाऊन काळात बनवले सव्वाशे शैक्षणिक व्हिडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:21 AM2021-04-04T04:21:16+5:302021-04-04T04:21:16+5:30
या व्हिडिओमध्ये ८० मुलाखती, ३१ पुस्तक परिचय व १४ भाषणे यांचा समावेश आहे. कुलकर्णी यांनी लाॅकडाऊनच्या काळात शिक्षक ...
या व्हिडिओमध्ये ८० मुलाखती, ३१ पुस्तक परिचय व १४ भाषणे यांचा समावेश आहे.
कुलकर्णी यांनी लाॅकडाऊनच्या काळात शिक्षक व विद्यार्थी व पालक यांना उपयुक्त ठरतील असे ११ महिन्यात १२५ चल चित्रध्वनीफिती तयार केल्या व सोशल मीडियावर अपलोड केल्या. त्यात ८० मुलाखती, ३१ पुस्तक परिचय व विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवर १४ व्याख्याने दिलेली आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होत आहे.
यात शिक्षक व शिक्षण अभ्यासक यांच्या मुलाखती, मराठी माध्यमातून शिकून इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलेल्या व्यक्तींशी इंग्रजीत गप्पा, रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती, कार्यरत व उपेक्षितांचे जग दाखवणारी पुस्तके व शिक्षणविषयक पुस्तकांचा परिचय व विविध विषयांवर व्याख्याने असे व्हिडीओ १ मे २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात केले आहेत.
..........
लाॅकडाऊनच्या काळात शिक्षक व विद्यार्थी समूहाला उपयुक्त ठरावेत . या भावनेने हा उपक्रम केला. यातून दुर्गम ठिकाणी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व उपक्रमशील शिक्षक यांचे डॉक्युमेंटरीचे करता आले. त्याचप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक पुस्तके यांचा परिचय करून देता आला याचे मोठे समाधान आहे.
-हेरंब कुलकर्णी