कोरोना रोखणाऱ्या गावांना सात लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:56+5:302021-06-11T04:14:56+5:30

लहामटे म्हणाले की, कोरोना योद्धे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले. तालुकाभर ...

Seven lakh fund to the villages blocking Corona | कोरोना रोखणाऱ्या गावांना सात लाखांचा निधी

कोरोना रोखणाऱ्या गावांना सात लाखांचा निधी

लहामटे म्हणाले की, कोरोना योद्धे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले. तालुकाभर कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी आरोग्यरथ फिरणार आहे.

कोरोना कालखंड असूनदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शंभर कोटींपेक्षा अधिक निधी तालुक्याला मिळवता आला. लवकरच तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय सुरू होईल. काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. एकजूटने पक्ष संघटन वाढवून, तालुक्यातील विकास कामे पूर्ण करून विरोधकांना विकास काय असतो, हे दाखवून देऊ; मात्र सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नका, समाज हितासाठी त्याचा वापर करा, असा सल्ला आमदार लहामटे यांनी यावेळी दिला.

सीताराम गायकर म्हणाले की, १९९९ला तालुक्यातील आम्ही चार- सहा कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यावेळचे तालुक्याचे आमदार आमच्या सोबत नव्हते, काही दिवसांनंतर ते राष्ट्रवादीत सामिल झाले होते. २२ वर्षात २१ वेळाच राष्ट्रवादीचा वर्धापनदिन साजरा करता आला, याची खंत आहे.

सुरेश गडाख, परबत नाईकवाडी, सुरेश खांडगे, स्वाती शेणकर, आर. के. उगले, विकास शेटे, तनुजा घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत विकास बंगाळ यांनी तर प्रास्ताविक विनोद हांडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप भानुदास शेणकर यांनी केले. चंद्रभान नवले यांनी आभार मानले.

संपत नाईकवाडी, राजेंद्र कुमकर, प्रकाश मालुंजकर, गुलाब शेवाळे, अशोक देशमुख, कचरू शेटे, भाऊपाटील नवले, आण्णासाहेब ढगे, संजय वाकचौरे, शरद चौधरी, रवी मालुंजकर, अक्षय आभाळे, ईश्वर वाकचौरे, संदीप शेणकर, अमित नाईकवाडी, ज्योती गायकर, स्वाती वाळुंज, उज्ज्वला राऊत, संतोष नाईकवाडी, जालिंदर बोडके, निखिल नवले, बाळासाहेब भालके, भागवत शेटे, भीमा रोकडे, नीता आवारी, सीमा मालुंजकर, जयश्री सावंत आदी उपस्थित होते.

वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय घोगरे, डाॅ. बाळासाहेब मेहेत्रे, डाॅ. अभिनव लहामटे, डाॅ. भारत ताले आदींसह आरोग्यसेवक, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

१० लहामटे

Web Title: Seven lakh fund to the villages blocking Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.