सात लाखांचे मोबाईल हॅण्डसेट लंपास
By Admin | Published: September 16, 2014 11:56 PM2014-09-16T23:56:42+5:302024-05-29T14:20:22+5:30
अहमदनगर: मार्केटयार्ड चौकातील सॅमसंग एका मोबाईल हॅण्डसेटच्या दुकानातून सात ते आठ लाख रुपयांचा माल चोरीला गेला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
अहमदनगर: मार्केटयार्ड चौकातील सॅमसंग एका मोबाईल हॅण्डसेटच्या दुकानातून सात ते आठ लाख रुपयांचा माल चोरीला गेला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
दुकानाचे शटरचे कुलुप तोडून चोरट्यांनी माल लंपास केला. या प्रकरणी शोरुमचे मालक धीरज डागा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर-मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन परिसरातील माऊली संकुलातील राम एजन्सी यांच्या सॅमसंग शोरुमचे शटर चोरट्यांनी उचकटले. ही घटनाही मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत मनीष मेघांनी यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. शो-रुमच्या गाळ््याचे कुलुप तोडण्याचाही प्रयत्न झाला. सावेडी भागातील झोपडी कॅन्टीन परिसरातील साई आयकॉन कॉम्प्लेक्समधील पीटर इंग्लड या दुकानातही रविवारी (दि.१४) चोरी झाली. या दुकानातून सात ते आठ लाखांचे तयार कपडे चोरीला गेले आहेत. शटरचे कुलुप लावण्याची पट्टी कापून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. रोख पाच हजार रुपये आणि सात लाखांचे कपडे चोरट्यांनी लंपास केले. या दुकानातील शो-पीस पुतळेही चोरण्यात आले आहेत. चोरी गेलेल्या मालात शर्टचे १४०० बॉक्स होते.
चोरीला माल नेण्यासाठी एखाद्या मोठ्या वाहनाचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त झाली आहे. शोरुमचे मालक शाम रामदास वैराळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीव्हीसेंटर रोडवरील तोफखाना पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या एका दुकानातूनही चोरी झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती.