जिल्ह्यात आज वाढले आणखी सात रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 10:01 IST2020-06-14T09:58:52+5:302020-06-14T10:01:24+5:30
अहमदनगर : शहरातील कल्याण रोड येथील 55 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. केडगाव येथील 29 वर्षीय व्यक्ती, 16 वर्षीय मुलगी आणि बारा वर्षाच्या मुलगाही बाधित आढळून आली आहे.

जिल्ह्यात आज वाढले आणखी सात रुग्ण
अहमदनगर : शहरातील कल्याण रोड येथील 55 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. केडगाव येथील 29 वर्षीय व्यक्ती, 16 वर्षीय मुलगी आणि बारा वर्षाच्या मुलगाही बाधित आढळून आली आहे.
खंडोबा चौक, राहाता येथील तेरा वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे.
संगमनेर शहरातील तीस वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाली आहे.मुंबईहून संगमनेर येथे आलेली 24 वर्षीय युवतीचाही अहवाल पॉझिटिव् आला आहे.
एकीकडे कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना आज सात रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 258 वर पोहोचली आहे.