संगमनेरात आज सात रुग्ण कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णांची संख्या ८० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 01:21 PM2020-06-12T13:21:16+5:302020-06-12T15:37:24+5:30

तालुक्यात शुकवारी (दि.१२ जून) नव्याने आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. हे सातही रुग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

Seven patients were found coronary in Sangamnera today; The total number of patients is over 80 | संगमनेरात आज सात रुग्ण कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णांची संख्या ८० वर

संगमनेरात आज सात रुग्ण कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णांची संख्या ८० वर

संगमनेरात : तालुक्यात शुकवारी (दि.१२ जून) नव्याने आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. हे सातही रुग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 
 संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या ८० झाली आहे. आतापर्यंत संगमनेर तालुक्यात कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी शहरातील ४ तर निमोण येथील ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

 संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ३ रुग्ण आहेत. हे तिनही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षाचा मुलगा आणि ३६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. 
    
संगमनेर शहरातील डाकेमळा परिसरातील एका ३८ महिलेला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिला कोरोनाबाधीत आढळून आली आहे.  तर लखमीपुरा येथील ३२ वर्षाची महिला व ४८ वर्षाचा पुरुष कोरोनाबाधित आढळला आहे, असेही निकम यांनी सांगितले.
 
दरम्यान,  अहमदनगर जिल्ह्यातील आज १९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. २५ जणाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

Web Title: Seven patients were found coronary in Sangamnera today; The total number of patients is over 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.