सात जणांचे अहवाल निगेटिव्ह, ‘त्या’ कोरोनाबाधिताचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 02:09 PM2020-04-30T14:09:36+5:302020-04-30T14:12:00+5:30

अहमदनगर : पुण्याच्या लष्करी महाविद्यालयाकडून आज सात जणांच्या घशातील स्त्राव नमुमे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नगर तालुक्यातील आलमगीर येथील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा  १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Seven people report negative | सात जणांचे अहवाल निगेटिव्ह, ‘त्या’ कोरोनाबाधिताचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह

सात जणांचे अहवाल निगेटिव्ह, ‘त्या’ कोरोनाबाधिताचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर : पुण्याच्या लष्करी महाविद्यालयाकडून आज सात जणांच्या घशातील स्त्राव नमुमे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नगर तालुक्यातील आलमगीर येथील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा  १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यात सध्या ४३ जण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी २४ जण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. २ जणांचा मृत्यू झालेला आहे, तर १७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी आलमगीर येथील एका कोरोनाबाधिताचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता केवळ १६ जणांवरच उपचार सुरू राहतील. 
दरम्यान गेल्या तीन दिवसात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. त्यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला आहे. आता लॉकडाऊन कधी उघडेल, याची प्रतिक्षा आहे. सध्या एकही नवीन पॉझिेटिव्ह रुग्ण आढळून आलेला नसल्याने लॉकडाऊन ३ मेनंतर खुला होईल, अशी आशा बळावली आहे. 
 
Web Title: Seven people report negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.