सातबारा दुरुस्ती शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:15+5:302021-06-25T04:16:15+5:30
२४ ते ३० जून या कालावधीत प्रत्येक गावातील तलाठी कार्यालयात या शिबिराचे आयोजन केले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ...
२४ ते ३० जून या कालावधीत प्रत्येक गावातील तलाठी कार्यालयात या शिबिराचे आयोजन केले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये १ ऑगस्ट २०१६ पासून संगणकीकृत सातबाराचे वाटप करण्यात येत आहे. मूळ हस्तलिखित उतारा व संगणकीकृत उतारा यामध्ये काही तफावत असल्यास त्या तफावती या शिबिरामध्ये दुरुस्त करण्यात येतील. यासाठी उतारा दुरुस्तीबाबत सर्व कागदपत्रे, जुने हस्तलिखित उतारे, मूळ नक्कल प्रत व जमीन महसूल अधिनियमानुसार सातबारा उतारा दुरुस्तीसाठी अर्ज सादर करावा.
२ व ३ जुलै या दोन दिवशी राहुरी, टाकळीमियाँ, ब्राह्मणी, देवळाली प्रवरा, वांबोरी, ताहराबाद, सात्रळ या मंडलांच्या कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी ११ ते २ या वेळेत हे शिबिर चालू राहील. तरी या शिबिरात खातेदारांनी सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन राहुरीचे तहसीलदार आर. एफ. शेख यांनी केले आहे.