सावली संस्थेने केला दिव्यांगांचा गौरव
By | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:36+5:302020-12-08T04:18:36+5:30
अहमदनगर : सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांगरत्न पुरस्कार ...
अहमदनगर : सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांगरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरातील तारकपूर भागात रविवारी हा दिव्यांगांचा गौरव सोहळा पार पडला.
जागतीक दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त या दिव्यांग गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ दत्तात्रय काटे हे होते. दिव्यांगांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शेवगाव पंचायत समीती सभापती क्षितिज घुले, सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद शेख, सचिव नवनाथ औटी, बाहुबली वायकर, सुनील वाळके, मनोहर मराठे, खलील शेख, गणेश महाजन आदी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांगरत्न पुरस्काराने सन्मानित केले तोच शाल, श्रीफळ, मानचिन्ह, सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांनी सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. मनोहर मराठे म्हणाले, दिव्यांगांना प्रेरणा मिळण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले. सूत्रसंचालन सुरेखा खेडकर यांनी केले. तर संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
--
फोटो- ०७ सावली संस्था
सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांगरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी दत्तात्रय काटे, क्षितिज घुले, बाबासाहेब महापुरे, चाँद शेख, नवनाथ औटी, बाहुबली वायकर आदी.