‘लाली’ने पटकावला शाहू मोडक करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:44 PM2018-09-04T14:44:54+5:302018-09-04T14:44:57+5:30
नगरमधील मानाचा समजला जाणारा शाहू मोडक करंडक न्यू आर्टस् कॉलेजच्या ‘लाली’ एकांकिकेने पटकावला असून, पेमराज सारडा कॉलेजच्या ‘पी़सी़ओ़’ या एकांकिकेने द्वितीय व ‘लाईफ आफ्टर ग्रीफ’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.
अहमदनगर : नगरमधील मानाचा समजला जाणारा शाहू मोडक करंडक न्यू आर्टस् कॉलेजच्या ‘लाली’ एकांकिकेने पटकावला असून, पेमराज सारडा कॉलेजच्या ‘पी़सी़ओ़’ या एकांकिकेने द्वितीय व ‘लाईफ आफ्टर ग्रीफ’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.
रविवारी रात्री येथील माउली संकुल सभागृहात विजेत्यांना शाहू मोडक यांच्या पत्नी प्रतिभाताई मोडक, त्यांच्या बहीण सुलभाताई मोडक, परीक्षक अभिनेते राहूल दिकोंडा, अभिनेत्री श्वेता मांडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले़ यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे नियामक मंडळ सदस्य सतिष शिंगटे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नगर जिल्हा निरीक्षक शशिकांत नजान, ज्येष्ठ अभिनेते अनंत जोशी आदी उपस्थित होते़ माउली संकुलात शनिवार व रविवार असे दोन दिवस या स्पर्धा चालल्या.
न्यू आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या ‘लाली’ या एकांकिकेस प्रथम क्रमांकाचा शाहू मोडक करंडक, पेमराज सारडा महाविद्यालयाच्या पी. सी. ओ. या एकांकिकेस द्वितीय क्रमांकाचा डॉ. श्रीराम रानडे करंडक तसेच तृतीय क्रमांकाचा दत्तोपंत अडगटला करंडकही पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘लाईफ आफ्टर ग्रीफ’ या एकांकिकेस प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन अमित खताळ यांनी केले़ पाहुण्यांचा परिचय प्रसाद बेडेकर यांनी करून दिला. प्रास्तविक प्रवीण कुलकर्णी यांनी केले. अमोल खोले यांनी आभार मानले. निकालवाचन सौरभ कुलकर्णी यांनी केले. नाट्यजल्लोष परिवाराने स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.