केडगावमधील शाहूनगर परिसर झाला कन्टेंटमेंट झोन घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 06:41 PM2020-06-15T18:41:05+5:302020-06-15T18:41:13+5:30
अहमदनगर : शहरातील केडगाव, शाहुनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या भागातून मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केडगाव, शाहुनगर परिसर कन्टेंटमेंट झोन घोषित केला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी दिली. दि. १५ ते २८ जूनपर्यंत हा परिसर कन्टेंटमेंट म्हणून राहणार आहे.

साईनगर पोव्हीजन, शाहूनगर चर्च, साईरम ट्रेडर्स, संकेत ढवळे, मथुरा ब्युटी पार्लर, समर्थ निवास, भोस यांचे घर, बी. आर. कवडे, दत्तात्रय जावक घर ते मुख्य रस्ता ते साईनगर प्रोव्हीजन हा भाग कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.
हा आहे बफर झोन
बँक कॉलनी, साई मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळेचा दक्षिणेकडील भाग, शारदा मंगल कार्यालय, साईराम ट्रेडर्सच्या पश्चिमेचा भाग, राजेंद्र टाक घर, शाहूनगर अंगणवाडी परिसर, मिलिंद रो-हाऊसिंग, मुळे कॉलनी, रेणुकानगर, गणपती मंदिर परिसर.