शेख यांच्यावरही टांगती तलवार
By Admin | Published: October 27, 2016 12:29 AM2016-10-27T00:29:11+5:302016-10-27T00:48:56+5:30
अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या कारवाईस स्थगिती देणारा त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी फेटाळला.
अन्नधान्यासह आर्थिक मदत : सविता बेदरकर यांचा पुढाकार
बोंडगावदेवी : विज्ञान युगातील आताच्या धकाधकीच्या जीवनात परमार्थ साधण्यासाठी धडपड करणारे महानुभाव सापडणे दुरापास्त झाले आहे. अशा वातावरणातही दुसऱ्यांच्या दु:खावर मायेची फुंकर घालणारे कोणी सापडले की समाजात संवेदनशिल माणसं असल्याचे समाधान मिळते. गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सविता बेदरकर यांनी या गोष्टीचा प्रत्यय दिला. गोंदियापासून ८० किमी अंतरावरील बाक्टी-चान्ना येथील अनाथ झालेल्या दोन बहीण-भावांना दिवाळीच्या तोंडावर आधार देण्याचे पुण्यकर्म त्यांनी केले.
या बहिण-भावाला मदत मिळावी यासाठी धडपड करीत दानदात्यांच्या मदतीने त्यांनी १ क्विंटल तांदूळ, गहू, मिरची पावडर तसेच दोघांनाही नवीन कपडे व रोख १५ हजारांची मदत मिळवून दिली.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी-चान्ना येथील स्नेहा (१४) आणि विराज (८) हे दोेघेही भावंड आई-वडिलांचे छत्र एकाएकी हिरावून गेल्याने अनाथ झाले. सज्ञान होण्याआधीच आई-वडिलांची सावली हिरावलेल्या त्या अनाथ भावंडांची परिस्थिती मांडणारे वृत्त ‘लोकमत’ने २५ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित करताच अनेक लोकांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. प्रा.सविता बेदरकर, महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष प्रा.डॉ.माधुरी नासरे यांच्यासह अनेकांनी ‘लोकमत’कडे त्या अनाथ भावंडांबाबत विचारणा केली.
प्रा.बेदरकर यांनी त्या भावंडांना कोणत्या प्रकारची मदत देता येईल हे जाणून घेतल्यानंतर त्यांच्यासाठी मदत गोळा केली. त्यानंतर म.रा.प्राथमिक शिक्षक समितीचे शाखा कार्याध्यक्ष कैलास हाडगे, अध्यक्ष सिध्दार्थ खोब्रागडे, शिक्षक नेते रमेश गहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद बडोले यांच्या उपस्थितीमध्ये अन्न-धान्य, कपडे व रोख १५ हजारांची मदत स्नेहा व विराज या भावंडाजवळ सुपूर्द केली.
बाक्टी-चान्ना येथील सामान्य कुटूंबात जीवन जगणारे दिनेश भजनदास मेश्राम (५२) यांचे २ जून २०१६ रोजी उष्माघाताने निधन झाले होते. पतीच्या निधनाचा धसका घेऊन पूर्वीच प्रकृती अस्वस्थ राहात असल्याने खचलेल्या त्यांच्या पत्नी रंजना (४५) यांनीही पतीच्या मागोमाग ३ महिन्यांनी जीव सोडला.
अवघ्या तीन-चार महिन्याच्या कालावधीत आई-वडिलांचे छत्र हरपल्याने दोन्ही भावंडं अनाथ झाली. स्नेहा ही मिलींद विद्यालय चान्ना बाक्टी येथे ९ व्या वर्गात तर विराज हा गावातील जि.प.प्राथ.शाळेत इयत्ता ३ मध्ये शिकत आहे.
मायेची, ममतेची उब देणाऱ्या आई-वडिलांचे असे जाणे खेळण्या बागडण्याच्या वयातील त्या भावंडांसाठी मोठा आघात होता. अशात त्यांना ८० वर्षीय आजी प्रभावती भजनदास मेश्राम हिच्या आधाराने जीवन जगण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्या अनाथ भावडांची माहिती सामाजिक बांधीलकी जोपासणारे जि.प.प्राथमिक शाळा बाक्टीचे सहायक शिक्षक तथा प्राथमिक शिक्षक समितीचे शाखा कार्याध्यक्ष कैलास हाडगे यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ कथन केल्यामुळे २५ सप्टेंबरच्या लोकमतमध्ये बातमी प्रकाशित झाली. (वार्ताहर)
- दानशुरांनी दिला मदतीचा हात
बेदरकर यांनी गोंदियाचे डॉ.घनश्याम तुरकर यांच्यासह शिव नागपुरे, डॉ.माधुरी नासरे, यशोदा सोनवाने, नानन बिसेन, आरती चवारे, नीना राऊत, सीता रहांगडाले, प्राजक्ता रणदिवे, प्रा.निता खांडेकर यांच्याकडून रोख मदत तर साकेत पब्लिक स्कूलचे संचालक चेतन बजाज यांच्याकडून १ क्विंटल तांदुळ, श्रीवास यांचेकडून गहू असे साहित्य जमा केले. कैलास हाडगे यांनी त्या अनाथ भावडांना गोंदियाला नेण्यासाठी स्वत: व्यवस्था केली. सविता बेदरकर यांनी आपल्या निवासस्थानी अनाथ भावंडाकडे जमा झालेले अन्नधान्य, स्वत: घेतलेले नवीन कपडे व रोख १५ हजार रुपये त्यांच्या सुपूर्द केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील म.रा.प्राथ.शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही यात मोलाचे सहकार्य केले. लोकमतच्या बातमीचा संदर्भ घेऊन गोंदियाच्या जि.प.महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जि.प.प्राथ.शाळा बाक्टीला पत्र पाठवुन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याच्या हेतुने आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून प्रस्ताव त्वरीत सादर करण्याचे निर्देश दिले.