शनीशिंगणापुरात भाविकांविनाच प्रथमच साजरी झाली शनिआमावस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 03:19 PM2020-06-20T15:19:31+5:302020-06-20T15:19:54+5:30

सोनई: आज शनिवारी शनीशिंगणापुर येथे शनिअमावस्यानिमीत्त होणारा उत्सव भाविकांविना साजरा करण्यात आला. शनिआमावस्या म्हटले की चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती असते. मात्र लॉकडाऊनमुळे प्रथमच भाविकांची गैरहजेरी दिसली. चार ते पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा शनिअमावस्या उत्सव आज मात्र दोन पुरोहित, सुरक्षा व स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Shaniamavasya was celebrated for the first time without devotees in Shanishinganapur | शनीशिंगणापुरात भाविकांविनाच प्रथमच साजरी झाली शनिआमावस्या

शनीशिंगणापुरात भाविकांविनाच प्रथमच साजरी झाली शनिआमावस्या

सोनई: आज शनिवारी शनीशिंगणापुर येथे शनिअमावस्यानिमीत्त होणारा उत्सव भाविकांविना साजरा करण्यात आला. शनिआमावस्या म्हटले की चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती असते. मात्र लॉकडाऊनमुळे प्रथमच भाविकांची गैरहजेरी दिसली.
चार ते पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा शनिअमावस्या उत्सव आज मात्र दोन पुरोहित, सुरक्षा व स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
त्र्यंबक महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत,विविध उपक्रमांनी साजरा होणारी शनीअमावस्या यंदा मात्र कोरोनाचे संकटामुळे शनीशिंगणापुरात शुकशुकाट दिसुन आला.
यात्रेने रस्ते,पुजा साहित्य दुकाने,हॉटेल,खेळण्याची दुकाने,भोजनालये,विश्रामगृह सह मंदिर परिसर भाविकांच्या गदीर्ने फुलून जात होता.मात्र यावर्षी सर्व परिसरात शुकशुकाट होता.पोलिस निरीक्षक वंसतराव भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व देवस्थान कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.
 

Web Title: Shaniamavasya was celebrated for the first time without devotees in Shanishinganapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.