शंकरराव गडाख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 02:19 PM2019-12-30T14:19:38+5:302019-12-30T14:19:44+5:30
अहमदनगर : महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात नेवासा मतदारसंघाचे शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव यशवंतराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गडाख यांच्यारुपाने नेवासा विधानसभा मतदारसंघाला प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

शंकरराव गडाख हे दुसºयांदा आमदार आहेत. २००९ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले होते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला. ते माजी खासदार, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत. शंकराव हे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष असून मुळा सहकारी साखर कारखाना, मुळा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ते विविध पदांवर कार्यरत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर गडाख यांनी शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले. त्यापूर्वीही गडाख यांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न झाले होते. मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून गडाख यांचे थेट ठाकरे यांच्याशी स्नेह राहिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून गडाख यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.