शांताबाई चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:05+5:302021-04-22T04:20:05+5:30

.............. ताराबाई शेंडकर यांचे निधन आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ताराबाई पुंजा ...

Shantabai Chavan passed away | शांताबाई चव्हाण यांचे निधन

शांताबाई चव्हाण यांचे निधन

..............

ताराबाई शेंडकर यांचे निधन

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ताराबाई पुंजा शेंडकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५९ वर्ष होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते आण्णा शेंडकर यांच्या त्या आई होत.

..............

नरेंद्र जामगावकर यांचे निधन

अहमदनगर : महापालिकेचे सेवानिवृत्त झोनप्रमुख नरेंद्र वल्लभदास जामगावकर (वय ७१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू असा परिवार आहे. मनपात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वत्र सुपरिचित होते.

..................

दत्तात्रय सगळगिळे यांचे निधन.

अहमदनगर : अभियंता कॉलनी तवले नगर येथील निवृत्त सहाय्यक फौजदार दत्तात्रय सयाजी सगळगिळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पोलीस कॉस्न्टेबल उदय सगळगिळे व जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या प्राध्यापिका मनिषा सगळगिळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

..............

किशोर चव्हाण यांचे निधन

कोपरगाव : किशोर लक्ष्मण चव्हाण (वय ३६, रा. साईसिटी, कोपरगाव) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

........................

सुरेश शेट

श्रीरामपूर : येथील मोरगे वस्ती परिसरातील सुरेश भागवत शेटे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन भाऊ, तीन मुली, सून, नातवंडे, जावई, बहीण असा परिवार आहे. व्यावसायिक शरद शेटे यांचे ते वडील होत.

...................

नंदाताई पवार

श्रीरामपूर : वडाळा महादेव येथील महाराष्ट्र साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या आई नंदाताई बबनराव पवार (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. साखर कामगारांचे दिवंगत नेते बबनराव पवार यांच्या पत्नी, तर नितीन पवार व पुणे येथील उद्योजक हेमंत पवार यांच्या त्या आई होत. नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

---------

मीनाबाई चव्हाण

श्रीरामपूर : नगरपालिका कामगार कॉलनीतील रहिवासी मीनाबाई चरण चव्हाण (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी उपनगराध्यक्ष चरण चव्हाण यांच्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्या आई व नगरसेविका प्रणिता चव्हाण यांच्या सासू होत.

...............

कचरू वाबळे

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कचरु रामहरी उर्फ आण्णा वाबळे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रामेश्वर, राजेंद्र, हरी आणि गोविंद वाबळे यांचे ते वडील होत.

........................

साईनाथ मच्छिंद्र भालेराव

चांंदेकसारे : इंडियन ओव्हरसीज बँकेचे कर्मचारी साईनाथ मच्छिंद्र भालेराव (३४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मीनानाथ व सोमनाथ भालेराव यांचे ते बंधू होत.

....................

दिनकरराव टेकणे यांचे निधन

भेंडा : मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिनकरराव टेकणे (वय ७६ , रा. माळीचिंचोरा, ता. नेवासा) यांचे बुधवारी भेंडा येथे आजारपणामुळे निधन झाले. ते १९८१मध्ये जिजामाता माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदावर रुजू झाले. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ५ सप्टेंबर १९९६ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

..............

अनंत भांड

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते अनंत भागवतराव भांड (वय ८७) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. वास्तू शिल्पकार महेश भांड यांचे ते वडील होत. वसंत, दिलीप आणि अशोक भांड यांचे ते थोरले बंधू होत.

.............

मुस्ताक शेख

श्रीरामपूर : माजी प्राचार्य मुस्ताक अहमदनजीर अहमद शेख (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू व पणतू असा परिवार आहे. प्राचार्य शेख रयत शिक्षण संस्थेत नोकरीला होते. डॉ. रिजवान शेख यांचे ते वडील तर नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अश्पाक शेख यांचे बंधू होत.

........................

पंढरीनाथ भोस यांचे निधन

श्रीगोंदा : निवृत्त पोलीस कर्मचारी पंढरीनाथ सहादू भोस (वय ६६, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांचे ते बंधू तर नगरसेवक गणेश भोस यांचे चुलते होत.

.................................

Web Title: Shantabai Chavan passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.