नगर जिल्ह्यात लाल रंग भगवा कधी झाला हे समजलेच नाही - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 09:04 PM2018-01-19T21:04:31+5:302018-01-19T21:07:36+5:30

पूर्वी नगर जिल्हा लाल बावट्यांचा बालेकिल्ला होता. पण पुढे लाल रंगाचा भगवा रंग कधी झाला, हे समजलेच नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर जिल्ह्याच्या बदललेल्या राजकीय धृवीकरणावर बोट ठेवले.

Sharad Pawar did not even know when the color red was saffron in the city | नगर जिल्ह्यात लाल रंग भगवा कधी झाला हे समजलेच नाही - शरद पवार

नगर जिल्ह्यात लाल रंग भगवा कधी झाला हे समजलेच नाही - शरद पवार

राहुरी/सात्रळ : पूर्वी नगर जिल्हा लाल बावट्यांचा बालेकिल्ला होता. पण पुढे लाल रंगाचा भगवा रंग कधी झाला, हे समजलेच नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर जिल्ह्याच्या बदललेल्या राजकीय धृवीकरणावर बोट ठेवले.
माजी आमदार पी. बी. कडू यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ समाजक्रांती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. स्वातंत्र्यसैनिक पी. बी. कडू समाजक्रांती पुरस्कार आमदार गणपतराव देशमुख यांना तर ‘रयत’च्या शाळांना मातोश्री शांताबाई कडू पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे होते.
पवार म्हणाले, पी. बी. कडू यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकरी शेतकरी व दीनदलितांसाठी वेचले. त्यांनी सत्ताधाºयांना शह देऊन प्रवरा कारखान्यात चमत्कार घडविला होता. मी प्रवरानगर येथे शिक्षण घेत असतांना त्यांची चळवळ जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांचा वारसा अरूण कडू हे पुढे चालवित आहेत, ही चांगली बाब आहे. माझे सात्रळ गावावर विशेष प्रेम असून पुरस्कार सोहळ्यानिमित्त तिस-यांदा या गावात येण्याची संधी मिळाल्याचे पवार म्हणाले.
आमदार देशमुख म्हणाले, कडू यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी घालविले. विधानसभेत कडू यांचे काम जवळून पाहिले. अध्यक्ष पदावरून वळसे म्हणाले, महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी भरीव काम केले, त्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता़ पैशासाठी वकिली न करता गरिबांना न्याय देण्यासाठी वकिली केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांना सात्रळला आणून शिक्षणाची गंगा त्यांनी सामान्य माणसाच्या दारी नेली.
कार्यक्रमास रयतच्या उपाध्यक्षा जयश्री चौगुले यांचेही भाषण झाले. प्रास्तविक रयतचे उपाध्यक्ष अरूण कडू यांनी केले. कार्यक्रमास आमदार बाळासाहेब थोरात, आमदार मधुकर पिचड, दादाभाऊ कळमकर, डॉ़ सुधीर तांबे, चंद्रशेखर घुले, प्रसाद तनपुरे, आमदार शिवाजी कर्डिले, अरूण जगताप, नरेंद्र घुले, अविनाश आदिक, चंद्रशेखर कदम, डॉ़ अशोक विखे आदी उपस्थित होते. दिलीप शिंदे यांनी आभार मानले.

अरूण कडू लोकसभेचे उमेदवार!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असलेले अरूण कडू उपस्थितांना हात जोडून अभिवादन करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांनी कडू यांना, ‘असे हात जोडू नका. तुम्हाला लोकसभा लढवायची आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा’असे म्हणत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कडू यांच्या उमेदवारीची एकप्रकारे घोषणाच केली. त्यातच भरीस भर शरद पवार जिल्ह्यात येऊनही ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमास न जाता सात्रळमध्ये आल्याने पवारांनी कडू यांच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

Web Title: Sharad Pawar did not even know when the color red was saffron in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.