शरद पवार ग्रामसमृद्धी योजनांचे प्रस्ताव रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:39 AM2021-03-04T04:39:55+5:302021-03-04T04:39:55+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील विविध गावातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी गायगोठा, शेळीपालन, कुक्कुटपालनासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल केले ...
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील विविध गावातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी गायगोठा, शेळीपालन, कुक्कुटपालनासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल केले आहेत. तीन महिने होऊनही या प्रस्तावांना मंजुरी दिली जात नाही. या निषेधार्थ बुधवारी (दि.१०) तालुका शिवसेनेच्या वतीने पंचायत समितीसमोर बैठा सत्याग्रह करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका संघटक सविता ससे यांनी दिली.
दाखल केलेल्या प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांनी केली आहे, परंतु पंचायत समिती तपासणी सूचीमध्ये त्या व्यतिरिक्त कागदपत्रांच्या अटी घालून दाखल प्रस्ताव अपात्र केले जात आहेत. पश्चिम भागातील निवडुंगे, श्री क्षेत्र मढी, शिरापूर, तिसगाव, घाटशिरस,देवराई, सोमठाणे, कासारपिंपळगाव, हनुमान टाकळी, कोपरेसह विविध गावात जिल्हा परिषदेने हागणदारीमुक्त गाव असल्याचे माहिती फलक लावले असल्याची वस्तुस्थिती आहे. तरीही या प्रस्तावास शौचालय दाखल्याची नव्याने अट लावली जात आहे. ही मोठी शोकांतिका आहे, असा सवालही तालुका शिवसेनेच्या वतीने उपस्थित केला आहे.