शरण मार्केट जमीनदोस्त : मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:38 PM2019-07-12T12:38:23+5:302019-07-12T12:45:29+5:30
शहरातील तोफखाना येथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केट जमीनदोस्त करण्यात आले.
अहमदनगर : शहरातील तोफखाना येथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. या गाळ्यांवर महापालिकेने सकाळी कारवाई केली. आज महापालिकेने हे गाळे पाडले.
बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे झाली होती. त्यावर सुनावणी होऊन कारवाईचे आदेश देण्यात आले होते. कारवाई होत नसल्याने नगरविकास विभागाच्या सचिवांंकडुन लोकायुक्तांनी अहवाल मागविण्यात आला होता. या कारवाईत सुमारे १०३ गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलिस बंदोबस्तात कारवाई केली.