बिबट्याचा हल्ल्यात मेंढपाळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:40+5:302021-03-29T04:14:40+5:30
याबाबत माहिती अशी की, पापळवाडी परिसरात शेतात मेंढ्यांचे कळप बसलेले आहेत. त्यात शुक्रवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास बिबट्या कळपाजवळ ...
याबाबत माहिती अशी की, पापळवाडी परिसरात शेतात मेंढ्यांचे कळप बसलेले आहेत. त्यात शुक्रवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास बिबट्या कळपाजवळ आला. त्यात वाघुरीच्या बाहेर झोपलेल्या अंकुश रामदास पोकळे या मेंढपाळावरच बिबट्याने हल्ला चढविला. मात्र, त्यांनी तात्काळ सावध होत आरडाओरड केल्याने बिबट्याने जवळच्या उसात धूम ठोकली. यात या मेंढपाळाच्या डोक्याला बिबट्याच्या पंजाचे नख लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. दरम्यान या परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आणि घटना लक्षात घेता वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती बी.एम. पोले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री उशिरा परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.