पाण्याअभावी शेवंती सुकली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 05:46 PM2018-10-16T17:46:08+5:302018-10-16T17:46:13+5:30
शेवंतीच्या फुलांना दसरा दिवाळीत चांगला भाव येतो. शेवंतीची लागवड केली तर घरात दोन पैसे येतील असा विचार करून कामरगाव (ता. नगर) येथील शेतकरी मारूती काशिनाथ साठे यांनी ८० हजार खर्च करून फुल शेती केली. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास गेला . सारी शेवंती सुकून गेली.
योगेश गुंड
केडगाव : शेवंतीच्या फुलांना दसरा दिवाळीत चांगला भाव येतो. शेवंतीची लागवड केली तर घरात दोन पैसे येतील असा विचार करून कामरगाव (ता. नगर) येथील शेतकरी मारूती काशिनाथ साठे यांनी ८० हजार खर्च करून फुल शेती केली. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास गेला . सारी शेवंती सुकून गेली.
कामरगाव येथील शेतकरी मारूती साठे यांनी एक एकरात शेवंतीची लागवड केली. त्यासाठी ठिबकद्वारे पाणी देण्याची सोय केली. महागडे बी बियाणे आणले. खुरपणी खर्च, दजेर्दार खते वापरली. विहीरीला व बोअरला थोडेफार पाणी होते. शेवंतीची लागवड करताना रानटी सस्यापासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी शेताच्या चारही बाजुंनी तारेचे कूंपन केले. या सर्वासाठी तब्बल ८० हजार रुपये खर्च केले.
मोसमी पाऊस तर आलाच नाही. आता सगळी मदार परतीच्या पावसावर होती. दिड महिना परतीच्या पावसाची वाट पाहण्यातच गेला. मात्र पाऊस काही आलाच नाही. विहिरीचे पाणी आटले, कूपनलिकेला पाणी नाही. शेंवती फुलू लागली, मात्र शेवटचा पाण्याचा ढोस देण्याआधीच नेमके उपलब्ध असलेले पाणी आटले .टँकरने पाणी द्यायचे तर ते परवडणारे नाही .एका टँकर ला १७०० रुपये खर्च लागतो. टँकरने पाणी दिले असते तर किमान २० ते २५ टँकर लागले असते. त्यात आता बाजार भाव ही नाही. हाता तोंडाशी आलेला घास पाण्याअभावी निघुन गेला. दोन मुले व सारे कुटुंब शेतीवरच अवलंबुन आहेत. मोठा खर्च करून केलेली फूलशेती पाण्याअभावी सुकून गेली. त्यात फुलांना चांगले भावही नाह. यामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे .
आमच्या भागात झेंडू शेवंतीची लागवड अलिकडच्या काळात वाढत आहे. म्हणुन आम्हीही खर्च करून शेवंतीची लागवड केली. सुरूवातीला पाणी होते पण अखेरच्या टप्प्यात पाऊस न झाल्याने पाणी कमी पडल. परिणामी फुले सुकून गेली .
- मारूती साठे, शेतकरी, कामरगाव