शेवगावात भाजपने राज्य सरकारचा नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:17+5:302021-03-22T04:19:17+5:30

शेवगाव : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ...

In Shevgaon, BJP protested against the state government | शेवगावात भाजपने राज्य सरकारचा नोंदविला निषेध

शेवगावात भाजपने राज्य सरकारचा नोंदविला निषेध

शेवगाव : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव शहरातील क्रांती चौकात आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. या वेळी शेवगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास क्रांती चौकात आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद्र लोढे, भीमराव सागडे, कचरू चोथे, गणेश कराड, उमेश धस, गुरुनाथ माळवदे, सालार शेख, बाळासाहेब डोंगरे, वंजीर पठाण, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, गणेश कोरडे, नितीन दहिवाळकर, नितीन फुदे, वाय.डी. कोल्हे, अशोक गाढे, अशोक ससाणे, बब्बू शेख, गंगा खेडकर, बाळासाहेब झिरपे, कल्याण देवढे, नितीन बडधे, संदीप वाणी, आदिनाथ डमाळ, संभा जायभाय, सतीश वैद्य, किरण पाथरकर, नवनाथ कवडे आदी उपस्थित होते.

---

२१ शेवगाव आंदोलन

Web Title: In Shevgaon, BJP protested against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.