शेवगावच्या शेतकऱ्यांनी जायकवाडीला भरली ३४ लाखांची पाणीपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:36+5:302021-04-04T04:20:36+5:30

दहिगावने : जायकवाडी जलफुगवटा शेवगाव शाखा क्र. ३ व ४ चा यंदाचा वसूल आजपर्यंतचा नवा विक्रम करणारा आहे. २०२०-२०२१ ...

Shevgaon farmers pay Rs 34 lakh for Jayakwadi | शेवगावच्या शेतकऱ्यांनी जायकवाडीला भरली ३४ लाखांची पाणीपट्टी

शेवगावच्या शेतकऱ्यांनी जायकवाडीला भरली ३४ लाखांची पाणीपट्टी

दहिगावने : जायकवाडी जलफुगवटा शेवगाव शाखा क्र. ३ व ४ चा यंदाचा वसूल आजपर्यंतचा नवा विक्रम करणारा आहे. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात शेवगावच्या शेतकऱ्यांनी तब्बल ३४ लाख ६९ हजार ८७१ रुपयांची पाणीपट्टी भरली. योजना कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंतची ही सर्वोच्च वसुली आहे. त्यामुळे शेवगाव जलफुगवटा शाखेचे शाखाधिकारी सुभाष गायकवाड यांनी या बागायतदार शेतकऱ्यांचे कौतुक करत आभारही मानले.

मागील वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेला काही काळ लॉकडाऊनचा सामना करावा लागला. अनेक निर्बंध आजपर्यंत कायम आहेत. या परिस्थितीत शेतमालाचे भाव कोसळले आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अशा विपरीत परिस्थितीत अगोदर अतिवृष्टी व परतीच्या पावसाने खरिपाचे नुकसान केले, तर सतत बदलते वातावरण व काही भागांत अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर घातली. अशा आर्थिक अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी यंदा जायकवाडी जलफुगवटा शाखेला आजपर्यंतचा सर्वोच्च वसूल दिला. तालुक्यातील अंदाजे ३० गावांच्या शेतकऱ्यांकडून मार्च २०२१ अखेर पाणीपट्टीद्वारे ३४ लाख ६९ हजार ८७१ रुपये इतका महसूल जमा झाला. याअगोदर २०१८- २०१९ या आर्थिक वर्षात २८ लाखांची सर्वोच्च पाणीपट्टी जमा झाल्याची नोंद आहे.

बीटप्रमुख ए.व्ही. नजन, डी.एम. नखाते, ए.एस. दळवी, ए.के. काळे, ए.सी. शेख, आर.एस. दराडे यांनी महसूल जमा करण्यासाठी परिश्रम घेतले. दहिगावने बीटप्रमुख ए.के. काळे व घोटण बीटप्रमुख डी.एम. नखाते यांनी सर्वोच्च वसूल केला.

--

बीटप्रमाणे असा झाला वसूल

दहिगावने ७ लाख ३७ हजार २४८, शहरटाकळी ४ लाख ६८ हजार ५००, शेवगाव ४ लाख ३६ हजार १००, दहिफळ ५ लाख ७० हजार १००, घोटण ७ लाख ९७ हजार २९०, गदेवाडी ४ लाख ६० हजार ६३३.

---

काही नवीन पाणी परवाने दिल्याने योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढली. परिणामी, पाणीपट्टीतही वाढ झाली. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद प्रशंसनीय आहे. आर्थिक अडचणीच्या काळातही शेतकऱ्यांनी दिलेल्या वसुलाबद्दल आभार. आमच्या कर्मचाऱ्यांनीही वसुलीसाठी परिश्रम घेतले, त्यांचेही आभार.

-सुभाष गायकवाड,

शाखाधिकारी, जायकवाडी जलाशय जलफुगवटा शाखा, शेवगाव

Web Title: Shevgaon farmers pay Rs 34 lakh for Jayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.