शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा : हर्षदा काकडे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:50 PM2018-08-08T17:50:27+5:302018-08-08T17:50:45+5:30
तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांवर पिण्याचे पाणी व जनावरांना चारा असे मोठे संकट निर्माण झाले आहेत.
शेवगाव : तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांवर पिण्याचे पाणी व जनावरांना चारा असे मोठे संकट निर्माण झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन लावलेली, पेरलेली पिके पावसाअभावी जळून चालली आहेत. त्यामुळे समक्ष पाहणी करून शेवगाव तालुक्यातील पूर्वभाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी प्रांताधिकारी डॉ विक्रमसिंह बादल यांना निवेदन दिले. यावेळी यावेळी हरिभाऊ फाटे, अंबर बर्डे, संजय आंधळे, जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, सोमनाथ आंधळे, संतोष गुंजाळ, सिराज शेख, जगन्नाथ गरड, लक्ष्मण गरड, मुकुंद कासुळे, ताराचंद फाटे, कारभारी ढाकणे, शिवाजी कणसे, शिवाजीराव औटी, मच्छिंद्र टेकाळे, विजय मुरदारे, भागवत राशीनकर, एकनाथ ढाकणे, भाऊसाहेब चेडे, राजेंद्र पोटफोडे, अप्पासाहेब साळवे, चाँद शेख आदी उपस्थित होते.