बोधेगावातील महिला निर्माण करतेय शिलाई ब्रँड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:19 AM2021-01-21T04:19:43+5:302021-01-21T04:19:43+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या ग्रामीण भागातील एका महिलेने शिक्षणानंतर नोकरीची संधी सोडून स्वतंत्र व्यवसायातून स्वतःचे अस्तित्व निर्माण ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या ग्रामीण भागातील एका महिलेने शिक्षणानंतर नोकरीची संधी सोडून स्वतंत्र व्यवसायातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा शिलाई ब्रँड तयार करत आहे. यासाठी त्यांनी पतीच्या मदतीने अहमदनगर येथे डिझाईनर ब्लाऊजचे दालन उभारले आहे.
बोधेगाव येथील चांदणी ज्ञानेश्वर झांबरे (वय ३०) यांचे बी.ए., डी.एड.पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांनी काहीकाळ स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. परंतु, माणसात किमान एक तरी कौशल्य असावे. जेणेकरून ते कोणत्याही प्रसंगात वापरून स्वत:ला सिद्ध करू शकतो. ही वडिलांनी दिलेली शिकवण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. चांदणी यांना लहानपणापासूनच शिवणकलेची आवड होती. त्यानुसार त्यांनी औरंगाबाद येथे फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले. चांदणी यांच्या कलेला उत्तेजन देण्यासाठी पती ज्ञानेश्वर झांबरे यांनी बळ देऊन अहमदनगर येथे ब्लाऊज दालन उभारले आहे. या ठिकाणी महिलांना विविध प्रकारच्या डिझाईनचे ब्लाऊज शिवून मिळत असल्याने चांदणी झांबरे यांनी या क्षेत्रातील स्वतःचा ब्रँड तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच चांदणी झांबरे यांनी महिलावर्गाचा चोखंदळपणा, त्यांची नेमकी मानसिकता याचा अभ्यास करून सुंदर डिझाईन व चांगल्या फिटिंगचे ब्लाऊजच्या निर्मितीवर भर दिला आहे.
फोटो २० चांदणी झांबरे