विरोधकांवर उमेदवार आयातीची वेळ-राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 02:36 PM2019-09-28T14:36:40+5:302019-09-28T14:36:56+5:30

पाच वर्षात केलेल्या विकास कामामुळे मतदारसंघात विरोधात उभे राहण्यासाठी एकही माणूस विरोधकांना मिळत नाही. त्यामुळे बाहेरचे लोक माझ्या विरोधात उभे करण्यासाठी आणवे लागत आहेत. उमेदवार आयात करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

Shinde-Ram Shinde to import candidate on opponents | विरोधकांवर उमेदवार आयातीची वेळ-राम शिंदे

विरोधकांवर उमेदवार आयातीची वेळ-राम शिंदे

जामखेड : पाच वर्षात केलेल्या विकास कामामुळे मतदारसंघात विरोधात उभे राहण्यासाठी एकही माणूस विरोधकांना मिळत नाही. त्यामुळे बाहेरचे लोक माझ्या विरोधात उभे करण्यासाठी आणवे लागत आहेत. उमेदवार आयात करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.
शुक्रवारी जामखेड येथे सरपंच परिषद महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काशीद यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 
जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, काशिनाथ ओमासे, विलास मोरे, शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर, सावरगावचे काकासाहेब चव्हाण, बोर्लाचे कृष्णाराजे चव्हाण, आपटीचे नंदू गोरे, सातेफळचे गणेश लटके, रत्नापूरचे दादासाहेब वारे, धामणगावचे महारूद्र महारनवर, साकतचे सरपंच हरिभाऊ मुरुमकर, पाटोदाचे गफ्फार पठाण, नायगावचे भारत उगले, बांधखडकचे केशव वनवे, खांडवीचे डॉ. गणेश जगताप, अरणगावचे लहू शिंदे, नान्नजचे विद्या मोहळकर, राजुरीचे गणेश कोल्हे, धोंडपारगावचे सरपंच सुखदेव शिंदे, जवळाचे प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, मंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या काळात कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. त्यामुळे मतदारसंघातील जनता आता विकासाची फळे चाखू लागली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण पाणी योजनेच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी आम्ही कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. परंतु, जाहिरात केली नाही. विरोधक मात्र चॉकलेट गोळ्या वाटतात. त्यावर स्वत: चा फोटो छापतात, अशी कोपरखळी त्यांनी मारली.
बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला. त्यांचा बदला मी बारामतीकरांचे डिपॉझिट जप्त करायला लावून घेणार आहे, अशी टीका त्यांनी केली. 
यावेळी विठ्ठलराव राऊत, अ‍ॅड. प्रवीण सानप, गोरख घनवट, नगरसेवक महेश निमोणकर, राजेश वाव्हळ, बिभिषण धनवडे, संतोष गव्हाळे, भाजप शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, पांडुरंग उबाळे, मनोज कुलकर्णी, ज्ञानेश्वर झेंडे, प्रवीण चोरडिया, विलास मोरे, प्रा. अरुण वराट, डॉ. विठ्ठल राळेभात, अल्ताफ शेख, ईश्वर मुरुमकर, नागराज मुरुमकर, तुषार बोथरा, बाळासाहेब बोराटे, शरद कार्ले आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक अजय काशीद यांनी केले. पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांनी आभार मानले. 

Web Title: Shinde-Ram Shinde to import candidate on opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.