शिर्डी मतदारसंघात ३ वाजेपर्यत ४७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 03:41 PM2019-04-29T15:41:47+5:302019-04-29T15:42:53+5:30
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लागल्या आहेत
अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. दुपारी ३ वाजेपर्यत ४७ टक्के मतदान झाले आहे.
निवडणुकीसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही मतदानाची वेळ असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील 1710 मतदान केंद्रावर 15 लाख 84 हजार 303 मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेत आहेत. यात 8 लाख 21 हजार 401 पुरुष व 7 लाख 62 हजार 832 महिला मतदारांचा समावेश आहे.