शिर्डी मतदारसंघात ५ वाजेपर्यत ५६ टक्के मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 05:43 PM2019-04-29T17:43:22+5:302019-04-29T17:44:40+5:30
शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ५५.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ५५.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. अकोले तालुक्यात मतदारांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून आला. नेवासे तालुक्यात तुलनेने काही अंशी कमी मतदान झाले. असे असले तरी दुपारी उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर मतदानात वाढ होईल असा अंदाज आहे.
सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरवात झाली. नऊ वाजेनंतर मतदान केंद्रांसमोर मोठ्या रांगा दिसून आल्या. विशेष म्हणजे या खेपेला सर्वच राजकीय पक्षांकडून मतदान घडवून आणण्याकरिता लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव दिसून आला. मात्र तरीही मतदार स्वयंस्फुतीर्ने मतदान केंद्रांवर गेले. सकाळी नऊ वाजता अनेक केंद्रांवर रांगा दिसून आल्या. महिला व पुरुषांचा बरोबरीने यात सहभाग होता.
अकोले तालुक्यात दुपारी ५ वाजेपर्यंत ५५.६० टक्के मतदान नोंदविले गेले. दुपारी तीन वाजेपर्यंत संगमनेर (४५.३९), शिर्डी (४५.६७), कोपरगाव (४५.७७), श्रीरामपूर (४६.१२), तर नेवासेत (४२.६७) एवढे मतदान झाले.