शिर्डी निवडणूक निकाल 2019 : राधाकृष्ण विखे सातव्यांदा विजयी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:54 PM2019-10-24T12:54:02+5:302019-10-24T13:28:18+5:30

Shirdi Vidhan SAbha Election Result: शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांचा विखे यांनी पराभव केला. राधाकृष्ण विखे यांना ९६ हजार ९९५ मते मिळाली तर सुरेश थोरात यांना २८ हजार  मते मिळाली. १ लाख ६९ हजार एवढे मतदान झाले आहे. विखे ६९ हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले.

Shirdi Constituency- Election Results: Radhakrishna Vikhe won for the seventh time | शिर्डी निवडणूक निकाल 2019 : राधाकृष्ण विखे सातव्यांदा विजयी 

शिर्डी निवडणूक निकाल 2019 : राधाकृष्ण विखे सातव्यांदा विजयी 

शिर्डी  : शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांचा विखे यांनी पराभव केला. राधाकृष्ण विखे यांना ९६ हजार ९९५ मते मिळाली तर सुरेश थोरात यांना २८ हजार  मते मिळाली. १ लाख ६९ हजार एवढे मतदान झाले आहे. विखे ६९ हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले.
पहिल्या फेरीपासून राधाकृष्ण विखे यांना आघाडी घेतली होती. विखे यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपकडून निवडणुक लढवली होती.  शिर्डीतून गृहनिर्माणमंत्री भाजपकडून रिंगणात होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून सुरेश थोरात, बसपाकडून सिनोम जगताप, वंचित बहुजन आघाडीकडून विशाल कोळगे तर विश्वनाथ वाघ अपक्ष म्हणून रिंगणात होते. 
विशाल कोळगे ४ हजार ५२२ इतकी मते मिळाली.  गृहनिर्माणमंत्री भाजपच्या तिकिटावर रिंगणात होते. या मतदारसंघातून ते यापुर्वी सहा वेळा आमदार झाले होते. १९९५ साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर राधाकृष्ण विखे आमदार झाले. १९९७ आणि १९९९ साली शिवसेनेकडून ते आमदार राहिले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये येत २००४, २००९ आणि २०१४ मध्ये आमदार झाले. आता पुन्हा त्यांनी भाजपमध्ये गेले. 

Web Title: Shirdi Constituency- Election Results: Radhakrishna Vikhe won for the seventh time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.