शिर्डी दादर एक्सप्रेस सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:53+5:302021-02-18T04:35:53+5:30

आठवड्यातील रविवार, मंगळवार, बुधवार व गुरुवारी रात्री ८ वाजता साईनगर स्थानकावरून गाडी सुटणार आहे. बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिमा, ...

Shirdi Dadar Express started | शिर्डी दादर एक्सप्रेस सुरु

शिर्डी दादर एक्सप्रेस सुरु

आठवड्यातील रविवार, मंगळवार, बुधवार व गुरुवारी रात्री ८ वाजता साईनगर स्थानकावरून गाडी सुटणार आहे. बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिमा, पुणे मार्गे ती दादर (मुंबई) स्थानकावर पोहोचेल. बेलापूर स्थानकावर या रेल्वेगाडीचे रात्री ९ वाजून दहा मिनिटांनी आगमन होईल. दादर स्थानकावर पहाटे साडे सहा वाजता ती पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१०४१) दादरहून मंगळवार, बुधवार, गुरुवार, व शनिवार हे चार दिवस धावणार आहे. दादरहून रात्री ११.५५ वाजता गाडी प्रस्थान करणार असून साईनगर स्थानकावर ती ९.२५ वाजता पोहचणार असल्याची माहिती प्रवासी संघटनेने दिली.

संघटनेचे प्रमुख रणजित श्रीगोड, सोलापूर विभागीय प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य विशाल फोपळे, स्थानक समितीचे सदस्य नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मंजुश्री मुरकुटे, संजय जोशी, अनिल कुलकर्णी, गोरक्ष बारहाते, बन्सी फेरवाणी यांनी निर्णयाचे स्वागत केले.

साईभक्त व नगर जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीची ठरणार्या या रेल्वेचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईनगर स्थानकचे प्रबंधक एल.पी.सिंग, वाहतूक निरीक्षक पी.के.ठाकूर, वाणिज्य प्रबंधक ए.जे.देशमुख यांनी केले आहे. ही गाडी सुरू करावी यासाठी प्रवासी संघटनेने प्रशासनाला १० हजार सह्यांचे पत्र पाठविले होते.

या एक्सप्रेसला १ एसी टू टायर, १ एसी थ्री टायर, ६ द्वितीय स्लीपर आरक्षण व ४ जनरल बोगी उपलब्ध करण्यात येणार असून मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या शासकीय अधिकारी, पर्यटक, व्यापारी, उद्योजक, राजकिय कार्यकर्ते यांची मोठी सोय झाली आहे.

Web Title: Shirdi Dadar Express started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.