शिर्डी लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी लक्ष घालावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:20 AM2021-05-14T04:20:09+5:302021-05-14T04:20:09+5:30
संगमनेर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. गरजू व सामान्य रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध ...
संगमनेर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. गरजू व सामान्य रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत तसेच योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपण लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना युवा सेनेचे उत्तर नगर जिल्ह्याचे प्रमुख अमित राधाकिसन चव्हाण यांनी केली आहे.
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. अनेकदा पुरवठा झाल्यास तो अपूर्णच होतो. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत असून, ही लस अनेकदा उपलब्ध होत नाही. तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना मुदतीनंतर दुसरा डोस उपलब्ध होत नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कुठल्याही प्रभावी उपाययोजना राबविल्या जात नाहीत. त्यामुळे आता आपणच शिर्डी लोकसभा मतदारसंघात लक्ष घालावे, असे पर्यावरण मंत्री ठाकरे यांना चव्हाण यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.